in ,

आयपीएल 2021चा दुसरा टप्पा 17 सप्टेंबरपासून रंगणार ?

क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी समोर येत आहे. कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल 2021 चे 14 वे सत्र आता यूएईमध्ये पूर्ण होणार आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला 17 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असल्याची माहिती काही वृत्तपत्रांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र अधिकृतरित्या ही तारीख अद्याप जाहीर झालेली नाही आहे.

बायो बबलमध्ये कोरोनाच्या प्रवेशानंतर 29 सामन्यांनंतरच लीग पुढे ढकलण्यात आली. नुकतीच बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित 31 सामने यूएईमध्ये खेळण्याची घोषणा करण्यात आली. पण माध्यमांच्या वृत्तानुसार, आयपीएल 2021चा दुसरा टप्पा 17 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना 10 ऑक्टोबरला खेळला जाईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Watch Video; लेकीच्या लग्न विधींवेळी भाजप आमदाराचा तुफान डान्स; कोरोना नियमांचे उल्लंघन

‘आरक्षणाविरोधात भाजपच लोकांना कोर्टात पाठवतोय’