in

Parambir Singh;परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.एका पोलीसानेचे हे परमबीर सिंग यांच्यावर हे आरोप केले आहेत. या संदर्भातील भ्रष्टाचाराची तक्रार पोलीस महासंचालकाला दिली असून त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही जोडून हे पत्र दिलं आहे.

अकोला पोलीस नियंत्रण कक्षाचे इन्स्पेक्टर बी. आर.घाटगे यांनी हि तक्रार केली आहे. या १४ पानी तक्रारीमध्ये घाडगे यांनी सिंग यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकारांमध्ये सामील होते. या पत्रात घाडगे यांनी जमीन घोटाळे, सरकारी निवासस्थानाचा तसंच सुविधांचा गैरवापर आणि इतर प्रकारच्या भ्रष्टाचारांमध्ये ते सामील असल्याचा आरोप केला आहे.

सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना घाडगे बाजार पेठ पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असल्याचंही घाडगे यांनी सांगितलं आहे.पीटीआयशी बोलताना घाडगे म्हणाले, “माझ्याकडे या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आहेत आणि जेव्हा चौकशी सुरु होईल तेव्हा हे पुरावे मी सादर करेन”.यावर सिंग यांनी अद्याप कोणतंही भाष्य केलेलं नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मध्य रेल्वेने केल्या 10 प्रवाशी गाड्या रद्द

लसीची किंमत कमी करा , सरकारचं सीरम भारत बायोटेकला आवाहन