in

शेगावमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. शनिवारी रात्री या ठिकाणी छापा मारला. या कार्यवाही मध्ये एका युवतींसह एका ग्राहकाला आणि हॉटेल मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूरच्या दलालांकडून पाठवण्यात आलेल्या कॉल गर्लच्या माध्यमातून शेगावातील लॉजवर देहविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत यांच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने बाळापूर रोडवरील हॉटेलमध्ये छापा मारला. त्यावेळी दोन जण आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. शनिवारी रात्री १० ते ११ वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. हॉटेलचा व्यवस्थापक प्रवीण लक्ष्मण तायडे आणि कुलदीप शिवाजी भाकरे या दोघांना पोलिसांनी अटक केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Tech Update | Mi 11X Pro ची प्री-बुकिंग सुरू

ट्विटरवरचा अनोखा उपक्रम; ऑक्सिजन सिलेंडर, बेड आणि रेमडेसिविर बद्दल माहिती देणार