in

जगातील पहिला कोरोना लस घेतलेल्या शेक्सपिअरचे निधन

जगात सर्वप्रथम कोरोना लसीकरण सुरु झाल्यावर पहिला डोस घेतलेल्या विलियम शेक्सपिअर या पुरुषाचे ८१ व्या वर्षी निधन झाले आहे. ब्रिटीश मिडीयाने मंगळवारी शेक्सपिअर यांचे अन्य आजाराने निधन झाल्याचे म्हटले आहे. बिल नावाने प्रसिद्ध असलेले शेक्सपिअर यांचे कोवेन्ट्री रुग्णालयात २० मे रोजी निधन झाले. त्यांनी फायझर बायोएनटेकची कोविड लस घेतली होती.

८ डिसेंबरला शेक्सपिअर जगभर प्रसिद्ध झाले ते वॉरवीकशायरच्या कोवेन्ट्री विद्यापीठ इस्पितळात करोना लसीचा पहिला डोस घेणारे म्हणून. अर्थात करोना लस घेणारे जगातील ते दुसरी व्यक्ती होते कारण त्यांच्या पूर्वी काही मिनिटे अगोदर ९१ वर्षीय मार्गारेट या महिलेला पहिला डोस दिला गेला होता. शेक्सपिअर करोना लसीचा पहिला डोस घेणारे पुरुष ठरले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देशात इंधन दराने गाठला उच्चांक!

”ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही”