in

शरद पवारही दिल्लीला रवाना; फडणवीसही राजधानीत असल्याने राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार आज दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. मुंबईतील नियोजित सर्वच कार्यक्रम सोडून ते राजधानी दिल्लीत जात आहेत. विशेष म्हणजे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील दिल्लीत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दिल्ली दौऱ्यात शरद पवार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. विरोधकांची बैठक असून त्यात सहभागी होण्यासाठी शरद पवार गेल्याचंही बोललं जात आहे. मात्र नेमकं कारण गुलदस्त्यात आहे.

दुसरीकडे चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत खलबतं सुरु आहेत. दोन्ही नेते भाजपाच्या महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची त्यांनी भेट घेतली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला, दोन तासांत 6 लाख कोटींचे नुकसान

नवीन वर्षात मेट्रोचा प्रवास होणार वेगवान, मेट्रो २ अ, मेट्रो ७ चे 80 टक्के काम पूर्ण