in

‘शरद पवार गॉडफादर, मग ठाकरे सरकारच्या निर्णयाचा दोष त्यांच्यावर जाणारच’

शरद पवार हे सर्वांचे गॉडफादर आहेत. महाविकास आघाडीत सगळे त्यांचे ऐकतात. त्यामुळे कोणत्याही निर्णयाचा दोष त्यांच्यावर जाणारच असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. ओबीसी आरक्षणाच्या बाबत सुरु असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पवार आरक्षण प्रश्नाला जबाबदार असल्याचे म्हणले होते. त्या पारश्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. इतकंच नाही कर आरक्षण प्रश्नी आपण थेट डिबेटला तयार असल्याचेही त्यांनी म्हणले आहे. “

सध्याच्या भेटीगाठी हा संघर्ष संपवण्यासाठी आहेत का असं विचारल्यावर पाटील म्हणाले ” भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही. भेटीगाठी अनेक कारणांनी सुरु आहेत. पवार आजारी आहेत ही त्यांची चौकशी करायला. रक्षा खडसेंची भेट देखील घेतली. दुश्मन जरी असला तरी भेट घेणं ही संस्कृती”

पुण्यात झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या वादाबाबत बोलताना पाटील म्हणाले ” संघर्ष ही काही नवी गोष्ट नाही. वाद होणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. जर संवाद नसेल तर अडचण असते. पण इथे ते आहे त्यांमुळे काळजी करण्याचे कारण नाही. “

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमेझॉन प्राईमवरील ‘मुंबई सागा’ चित्रपटाचे निर्माते अडचणीत

‘ओ परबांनू, आयकतास ना! मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका; उगाच उद्या इज्जत जावुक नको’