राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधला आहे. कोरोनाच्या या कठीण संकटकाळाला धैर्याने सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे पवार यांनी म्हटले. राज्य सरकारला नाईलाजाने कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत, कारण याशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी आपण संपर्क साधला. त्यावेळी, केंद्र सरकार संपूर्णपणे महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले, असंही पवार म्हणाले. कामगार, शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य सर्वांनाच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, कित्येकांना आर्थिक झळ बसत आहे. या परिस्थितीला आपण धैर्याने सामोरे गेलेच पाहिजे, याला पर्याय नाही. जनतेच्या जीविताच्या दृष्टीने राज्य सरकार कठोर निर्णय घेत आहे. त्यासाठी, सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असंही पवार यांनी म्हटलं आहे.
Comments
Loading…