in

शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करत यांसदर्भात माहिती दिली आहे.

शरद पवार यांच्या तोंडामध्ये अल्सर झाल्याचे आढळले. त्यामुळे तातडीने हा अस्लर काढून टाकण्याची शस्त्रक्रिया ब्रीच कॅंडी हॉस्पिटमध्ये करण्यात आली आहे. सध्या राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे हॉस्पिटलमध्येच दाखल असून ते पुरेशी विश्रांती घेत असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांना पित्ताशयाच्या खड्याचा त्रास होऊ लागल्याने ३० मार्च रोजी त्यांच्या पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर पंधरवड्यातच त्यांचे पित्ताशय काढून टाकण्याचा निर्णय ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने घेतला. डॉ मायदेव यांच्या अध्य़क्षतेतील टीम शरद पवारांची गॉल ब्लॅडरची शस्त्रक्रिया केली. त्यानंतरच्या नियमित आरोग्याच्या पाठपुराव्यासाठीच शरद पवार हे ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये आले होते.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फडणवीसांनी मानले पंतप्रधानांचे आभार…सर्वाधिक ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाल्याचा दावा

DD vs SRH | सनराइजर्स हैदराबाद VS दिल्ली कॅपिटल्स आमने सामने