in

शिवसेनेचे आमदार कैलास पाटील दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

शिवसेनेचे आमदार कैलास पाटील दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पाटील यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील इतर रुग्णांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान पाटील यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आमदार कैलास पाटील पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आता सर्दी व इतर लक्षणे आल्याने टेस्ट केल्यानंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना आता दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.पाटील यांच्यासोबत संपूर्ण कुटुंबाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान आमदार पाटील यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. तर आई वडील खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुणेकरांना दिलासा:सलग आठव्या दिवशी नव्या रुग्णसंख्येत घट

Weekly Horoscope: साप्ताहिक राशिभविष्य 26 एप्रिल ते 2 मे 2021