in

‘दिल्लीचे पातशहा महाराष्ट्राची कोंडी करताहेत’

‘महाराष्ट्रात मराठी बाण्याचा मुख्यमंत्री आणि सरकार असल्यामुळे दिल्लीचे आजचे पातशहा महाराष्ट्राची हरतऱ्हेने कोंडी करत आहेत. राज्यातलं लसीकरण दिल्लीच्या आडमुठेपणामुळे थांबलं आहे. ज्या महाराष्ट्रानं देशाला आर्थिक प्राणवायूचा पुरवठा केला, त्या महाराष्ट्राला आज प्राणवायूचा तुटवडा जाणवतो आहे. महाराष्ट्रात काहीही करून राजकीय आणि आर्थिक गोंधळ निर्माण करून राज्य बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे’, अशा शब्दांत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

‘महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही,. महाराष्ट्राला इतिहास आहे, बूड आहे म्हणून तो टिकला आहे. आज महाराष्ट्रावरचं संकट मोठं आहे. करोना विषाणूनं मोठं आव्हान उभं केलं आहे. शंभर वादळे, शंभर भूकंपांनी पडझड होणार नाही त्यापेक्षा जास्त पडझड एका विषाणूने केली. महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत राहील आणि विजयी होईल’, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

‘दिल्लीतील सरकारे बदलत राहिली, तरी महाराष्ट्राशी वैर काही संपलेले नाही. महाराष्ट्राचे हक्काचे काही मिळूच द्यायचे नाही. महाराष्ट्राला ओरबाडायचे, त्याची लूट करायची हे धोरण मात्र सर्व काळात कायम राहिले. राज्यातल्या अनेक योजना आणि प्रकल्प गुजरातला नेऊन ठेवले मुंबईचं महत्त्व कमी करायचं आणि राज्याची आर्थिक रसद तोडायची हाच त्यामागचा हेतू होता’, अशा शब्दांत टीका करण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गुजरातेत अग्नितांडव : कोव्हिड सेंटरमध्ये आग लागून १८ रुग्णांचा मृत्यू

‘थोर विभुती आणि समाजसुधारकांचं स्मरण करणं औचित्यपूर्ण’