in

“मोदी नावाचा वापर करून नेतान्याहूंनी कोरोना पळवून लावला असंही भक्त मंडळी बोलू शकतात”

‘पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने करोना लढ्याचे नेतृत्व करत होते ते पाहता इस्रायलच्या आधी आपला हिंदुस्थानच जगात करोनामुक्त होईल असं वातावरण अंधभक्तांनी निर्माण केलेच होते,’ असं म्हणत शिवसेनेनं भाजपा कार्यकर्त्यांसह समर्थकांचे कान टोचले आहेत. सामनामधून केंद्र सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

इस्रायल या देशाने करोनावर मात केली आहे. करोनामुक्तीची घोषणा करणारा इस्रायल हा जगातील पहिला देश ठरला आहे. पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने करोना लढ्याचे नेतृत्व करत होते ते पाहता इस्रायलच्या आधी आपला हिंदुस्थानच जगात करोनामुक्त होईल असं वातावरण अंधभक्तांनी निर्माण केलेच होते. पण करोनामुक्ती सोडाच, देशात करोनानं घातलेलं थैमान हाताबाहेर गेलं. इस्रायलने देश करोनामुक्त होण्यासाठी काय केले? त्यांनी संपूर्ण लसीकरण तर केलेच, पण नियम आणि निर्बंधांचे काटेकोर पालन केले. फालतू राजकारण, थाळ्या किंवा टाळ्या पिटून करोना पळवणे या नवटांक उद्योगांना थारा दिला नाही.

आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी यांना पत्र लिहून जी पंचसूत्री काल मांडली तेच धोरण इस्रायलने राबवले. मनमोहन हे शांतपणे काम करणारे नेते आहेत. पंतप्रधान मोदी यांनाही मनमोहन सिंग यांनी काही सूचना केल्या आहेत. करोनावर मात करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, पण लोकांचे लसीकरण होणे सर्वात महत्त्वाचे आहे. पुढील सहा महिन्यांत राज्यांना कशा पद्धतीने लसपुरवठा होईल याबाबत केंद्राने स्पष्टीकरण द्यावे, असे मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना सुचवले आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे तर मोदींना जवळचे मित्रच मानतात व नेतान्याहू यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात मोदी यांच्या होर्डिंग्जचा मोठ्या प्रमाणात वापर केला. मोदी नावाचा वापर करून नेतान्याहू यांनी त्यांच्या देशातील करोना पळवून लावला असंही भक्त मंडळ बोलू शकते. अशा प्रचारपंडितांना कोणी रोखायचे? ते तर सुरूच राहणार, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आता 18 वर्षांवरील सर्वांचं सरसकट लसीकरण; मोदी सरकारचा निर्णय

प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन डिस्ट्रिब्युशन प्लांट उभारणार राज्य सरकारचा निर्णय