in

‘सोमय्या यांनी चंद्रावर, मंगळावर जावं आणि…’

किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही अनेक आरोप केले आहेत. या आरोपांना आणि टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

‘आरोप करणाऱ्यांवर काल जी काही कारवाई झाली ती गृहमंत्रालयाने केली आहे. त्यामध्ये आकस आणि सूड या शब्दांचा वापर करु नये. मी पूर्ण माहिती घेतली असून गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न निर्माण होईल असं वाटलं. त्यातून ही कारवाई झाली असून यासंबंधी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाहीत. कोणी असे खोटे आरोप केले तर आमच्या सरकारला भोकं पडत नाहीत,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

‘तुमच्याकडे पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस, तपास यंत्रणा आहेत. त्या सगळ्या संस्था, महाराष्ट्र पोलीस दल, राज्यातील संस्था निष्पक्षपणे तपास करत असता. पण तुम्ही केंद्र सरकारच्या आदेशावर महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर, प्रमुख लोकांवर आरोप करत असाल आणि त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर गृहमंत्रालय कारवाई करु शकतं. त्याची आता राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याची गरज नाही. मी मुख्यमंत्र्यांशी याविषयी बोललो असून याचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नसल्याचं सांगितलं आहे,’ असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
‘किरीट सोमय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या लोकांच्या जमिनी शोधाव्यात. या देशात लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. असे आरोप याआधीही झाले आहेत. आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला कोणी टाळं लावू शकत नाही. कोणी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आरोप करायचं ठरवलं असेल तर आम्ही काहीच करू शकत नाही,’ असं संजय राऊत यावेळी म्हणाले. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना भगवा रंग सोडून हिरवा रंग धारण केल्याची टीका केली आहे. त्यासंबंधी बोलताना राऊत म्हणाले की, “कोणता रंग आमचा आहे तो त्यांना लवकरच कळेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“दरेकरांच्या गळ्यात भाजपची माळ आणि पायात चाळ”

शपथविधी : चरणजित सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री