in

धक्कादायक | कोरोनाग्रस्त वृद्धाने ऑक्सिजनच्या पाइपने घेतला गळफास

नागपूरमध्ये ट्रामा सेंटरमध्ये कोविड रुग्णांना दाखल करण्याची सुविधा आहे. गेल्या काही दिवसात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेकांना परत पाठविण्यात येत होते. जास्तीत जास्त रुग्णांना दाखल करून घेता यावे म्हणून ट्रामा केअर सेंटरच्या बेसमेंटचा उपयोग करून घेण्याचे ठरले व मागच्या आठवड्यात तेथे ९० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. गेल्या ४ दिवसांपासून गजभिये यांच्यावर उपचार सुरू होते. या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना येण्याची परवानगी नसल्याने त्यांच्यासोबत कोण होते व त्यांना येथे कोणी दाखल केले याचा शोध पोलीस घेत आहेत. मेडिकलच्या कागदपत्रात त्यांचा पत्ता रामबाग असा देण्यात आला आहे. रामबाग हा या हॉस्पिटलला लागून असलेलाच भाग आहे.

सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास कोरोनावर उपचार घेत असलेल्या एका वृद्धाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गळफास लावून आत्महत्या केली. रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये मागच्याच आठवड्यात सुरू झालेल्या वार्डात हा प्रकार घडला आहे.

तेथील सफाई कर्मचारी बाथरुममध्ये गेला असता गजभिये यांनी ऑक्सिजन मास्कच्या वायरनेच गळफास लावल्याचे आढळून आले. वायरचा एक भाग त्यांनी तेथील एक्झॉस्ट पंख्याला बांधला होता. सफाई कर्मचाऱ्याने मेडिकल प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर लगेच अजनी पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आली. रुग्णाला कोणी आणले, त्याचे नातेवाईक कोण, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गजभिये यांना २६ मार्च रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून कळू शकले नाही. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. घटनास्थळावर ‘सुसाइड नोट’ आढळलेली नाही. अजनी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत होतेय’; बाळासाहेब थोरात यांचा संजय राऊतांना टोला

Pandharpur election |अभिजित बिचुकले लढविणार पंढपुरातून पोटनिवडणूक