in

मुंबईत संजय गांधी नॅशनल पार्कसमोर पालिका अधिकाऱ्यावर गोळीबार

मुंबईत संजय गांधी नॅशनल पार्कसमोर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुवळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे, परिसरात नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू झाली आहे.

बोरिवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कसमोरून जात असताना मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. त्या गाडीच्या आत मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पीडब्ल्यूडी विभागाचे अधिकारी दीपक खांबित नावाचे अधिकारी बसले होते. 2 लोक दुचाकीवर आले आणि 2 राऊंड फायर करून पळून गेले. या गोळीबारात महानगर पालिका अधिकारी थोडक्यात बचावले आहेत. डीसीपी आणि अतिरिक्त सीपीसह गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले. तपास सुरू आहे, परिसरात नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू झाली आहे. घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजचीही छाननी केली जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

School Reopen | मुंबईतील शाळांची घंटा वाजणार; ‘या’ तारखेपासून भरणार वर्ग

स्वातंत्र्यानंतरही सोयी सुविधांपासून वंचित; रुग्णांना करावा लागतोय डालग्यातून प्रवास