in

अक्षय कुमार स्टारर OMG 2 चित्रपटाचे शूटिंग सुरु

बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार सध्या आपले अनेक प्रोजेक्ट पूर्ण करण्यात व्यस्त आहे. अक्षयकडे सध्या चित्रपटांची रांग लागली असुन आता त्याने OMG 2 चित्रपटचे शूटिंग सुरु केले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

ज्यात तो भगवान शिवच्या अवतारात दिसत आहे. पोस्टर शेअर करताना अक्षयने लिहिले की, “कर्ता करे न कर सके शिव करे सो होय”… तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे.

अक्षय कुमार OMG 2 चे शूटिंग उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातही होणार आहे. मात्र, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भेट देणाऱ्यांना कोणतीही अडचण नाही. यासोबतच शूटिंगमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.

‘ओएमजी 2’मध्ये अक्षय कुमारसोबत यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षयसोबत परेश रावल मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट धार्मिक श्रद्धांवर आधारित होता. OMG 2 या चित्रपटात जुनी गोष्ट पुढे नेण्यात येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण शहरातील धार्मिक स्थळांवर करण्यात येणार आहे. या चित्रपटात चाहत्यांना काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. ज्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Aryan Khan | राजकीय नेत्यांनी चमकोगिरी न करता तपास यंत्रणेला मदत करावी-उज्वल निकम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोना पॉझिटीव्ह