in ,

‘Oh My God 2’ चं शूटिंग पुढील दोन आठवड्यांसाठी रद्द

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर बॉलिवूड आणि टीव्ही मालीकांच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली होती. अशात आता पुन्हा चित्रीकरणाच्या सेटवर नवीन रुग्ण आढळून येत असून काही दिवसांपूर्वी अभिनेता पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेला ‘ओएमजी: ओ माय गॉड २’ चे शूटिंग सुरू झाले होते. मात्र आता या चित्रपटच्या क्रू मधील ७ सदस्यांची कोविड -१९ चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे .

या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत सुरू होते आणि गेल्या पाच दिवसात ७ लोकांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे चित्रपटाचा निर्माता आश्विन वर्दे याने चित्रपटाचे शूटिंग पुढील दोन आठवड्यांसाठी रद्द केलीआहे. .अभिनेता पंकज त्रिपाठी, यामी गौतम आणि दिग्दर्शक अमित राय यांची चाचणी निगेटिव्ह आली असून कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या सदस्यांना सध्या क्वारंटाईन करण्यात आले आहे.

‘ओ माय गॅाड’ या चित्रपटाचा पहिला भागा परेश रावल यांच्यामुळे सुपरहिट ठरला होता. मात्र या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये परेश रावल यांच्याऐवजी पंकज त्रिपाठींना घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिनेसृष्टीतील सूत्रांनी ‘बॉलिवूड हंगामा’ ला दिलेल्या माहितीनुसार, ‘ओ माय गॉड २’ या चित्रपटाच्या सिक्वेलमधील मुख्य भूमिकेसाठी परेश रावल पहिली पसंत होते. याबाबत निर्मात्यांनी त्यांच्याशी बातचीतदेखील केली होती. मात्र परेश रावल यांनी या भूमिकेसाठी अधिक रक्कमेची मागणी केल्याने निर्मात्यांनी त्यांना नकार दिला

अश्विनने या आधी ‘कबीर सिंग’, ‘नोटबुक’ सारख्या लोकप्रिय चित्रपटांची निर्माती केली आहे. ‘ओ माय गॉड 2’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, अभिनेत्री यामी गौतम प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातही अक्षय कुमार ‘देवा’ च्या रुपात दिसणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘पीएम केअर फंडात जमा पैसा कुठे जातोय? ऑडिट रिपोर्ट कुठे आहे?’

मुंबईत टीव्हीमध्ये झाला स्फोट