in

नंदुरबारमध्ये लघुचित्रपट दाखवून लसीकरणाबाबत जनजागृती

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार | नंदुरबार जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आला असला तरी, अद्याप असंख्य नागरीकांचे लसीकरण झाले नाही आहे. त्यामुळे जिल्ह्यातून कोरोनाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी एक अनोखी जनजागृती सुरू केली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले जात आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आली असून त्यात सर्वाधिक प्रभावी ठरले आहे ते लसीकरण. जिल्ह्यातील सहा लाख पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले असून अजुन काही भागात लसीकरण झालं नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी एक अनोखी जनजागृती सुरू केली आहे.

धडगांव तालुक्यातील विविध ठिकाणी विविध गावांत स्थानिक बोलीभाषेतून लघुचित्रपट व शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. लसीकरणाच्या जनजागृतीपर आदिवासी बोली भाषा चित्रपट तयार करून ते चित्रपट प्रोजेक्टर द्वारा विद्यार्थ्यांना दाखवला जात आहे. त्यामुळे लसीकरण याच्या टक्केवारी वाढणार असल्याचे मत प्रशासनाच्या वतीने केला गेला आहे.

सांस्कृतिक कलापथकं गीत व पथनाट्याच्या माध्यमातून प्रभावी प्रबोधन करत आहे. त्याच धरतीवर नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव सारख्या अतिदुर्गम भागातील विविध गावात जाऊन नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घ्यावी असे आवाहन करत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सीमाप्रश्नी सर्व पक्षांनी एकत्र यावे – शरद पवार

College Reopen | येत्या 20 अ़ॉक्टोंबरपासून कॉलेज सूरू होणार – उदय सामंत