in

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट; संदीप खरेच्या स्वरचित कवितांनी मैफिल

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवास आज प्रारंभ झाला. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय कवी संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या स्वरचित कवितांचा ‘ईर्शाद’ही मैफिल रंगणार आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आहेत. यंदा या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. हा महोत्सव 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान असाच सूरू राहणार असून यापूढे प्रसिद्ध गायक जावेद अली यांचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम, पं. विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘बियाँड बॉलिवूड’, महाराष्ट्राची सांगीतिक परंपरा उलगडणारा ‘रंग महाराष्ट्राचे’, कवी संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या स्वरचित कवितांचा ‘ईर्शाद’, ‘स्वरभास्कर’ हा भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना स्वरवंदना देणारा पं. आनंद भाटे, पं. जयतीर्थ मेवुंडी, पं. रघुनंदन पणशीकर व पं. शौनक अभिषेकी यांचा कार्यक्रम, ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांना समर्पित स्वरवंदना देण्यासाठी राकेश चौरासिया, अमर ओक, निलेश देशपांडे आणि वरद कठापूरकर यांचा ‘हरि–प्रसाद’, हृषिकेश रानडे, प्रियांका बर्वे, विश्वजित बोरवणकर, आनंदी जोशी यांचा कार्यक्रम लोकशाही न्यूजवर Lokshahi News आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या www.bhaurangari.com संकेतस्थळावर रात्री ८ वाजता पाहता येणार आहे. त्यामुळे या ऑनलाइन महोत्सवाचा गणेशभक्तांनी मनसोक्त आनंद घ्यावा, असे आवाहन लोकशाही न्यूज यानिमित्त करत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारत-ऑस्ट्रेलियाची ‘टू प्लस टू’ चर्चा

BDD chal No 20/19 Worli Mumbai-18