in

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट; बियॉंड बॉलिवूड कार्यक्रमाने गणेशभक्त झाले मंत्रमुग्ध

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव उत्साहात सूरू आहे. या उत्सवाला गणेशभक्तांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आज या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवात बियॉंड बॉलिवूड संगीताचा रंगला होता. या कार्यक्रमाला गणेशभक्तांनी चांगलीच पसंती दिली.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवात आज बियॉंड बॉलिवूड संगीताचा कार्यक्रम पं. विजय घाटे आणि सहकारी यांनी सादर केला होता. या कार्यक्रमाने गणेशभक्त मंत्रमुग्ध झाले होते.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आहेत. यंदा या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. हा महोत्सव 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान असाच सूरू राहणार आहे. ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव दरदिवशी लोकशाही न्यूजवर Lokshahi News आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या www.bhaurangari.com संकेतस्थळावर रात्री ८ वाजता पाहता येणार आहे. त्यामुळे या ऑनलाइन महोत्सवाचा गणेशभक्तांनी मनसोक्त आनंद घ्यावा, असे आवाहन लोकशाही न्यूज यानिमित्त करत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Lokshahi Impact | महिला तलाठी गैरवर्तन प्रकरण; प्रांताधिकारी सोपान कासारवर होणार कारवाई

पन्नाशीतल्या सतेज पाटील, विश्वजित कदमांना काँग्रेस राज्यमंत्री पदीचं कसं काय ठेवतंय ? अजित पवारांची खंत