in

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस


सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे.अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.तर काही झाडांची पडझड झाली आहे तर काही ठिकाणी घरांचे नुकसान देखील झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल दुपारी पासून पहाटे ३ :०० वाजेपर्यंत अती मुसळधार पाऊस पडत होता.त्यामुळे अनेक नद्यांना पूरस्थिती प्राप्त झाली होती. अकराच्या सुमारास सुमारे चार ते पाच तास माणगांव खोर्यातील निर्मला नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती . पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने व हा गाळ रस्त्यावर आल्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अद्याप कोणीही प्रशासनाचे अधिकारी किंवा स्थानिक प्रशासनाने हा गाळ बाजुला केलेला नाही. हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे. पुन्हा जर पाऊस पडला तर 27 गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दूध दर व शेतकरी प्रश्नांसाठी 17 जून रोजी महाराष्ट्रभर आंदोलन

पाहा ‘सुमी’ च्या मनमोहक अदा