चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना आतापर्यंत पोलिसांनी शंभर कोटीच्यावर देशी-विदेशी अवैध दारू पकडली. मात्र या पकडलेल्या दारूचे प्रमाण एकूण विक्रीच्या दोन टक्केसुद्धा नाही. चंद्रपूर जिल्ह्यात एक एप्रिल 2015 पासून संपूर्ण दारूबंदी लागू झाली. दारूचा एक थेंब देखील जिल्ह्यात येणार नाही, असं तेव्हा सांगितलं जात होतं. मात्र, मागील सहा वर्षांत तब्बल एकशे अठरा कोटी 31 लाख 99 हजार 438 रुपयांची अवैध दारू पोलिसांनी पकडली आणि 47 हजार 362 दारूतस्करांना अटक केली. मागील 6 वर्षांत पकडली 118 कोटींची अवैध दारू पकडली असून तब्बल 47 हजार 362 दारूतस्करांना अटक दारुबंदी असताना अवैध दारू तस्करी प्रकरणात पकडले आहे.
राज्यात नवीन सरकार सत्तेवर येताच दारुबंदी उठवण्याच्या हालचालींना आणि चर्चांना वेग आला. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोकमागणी लक्षात घेत या दारूबंदीचा आढावा घेण्यासाठी मागील वर्षी एक समिती स्थापन केली. त्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर झाल्यावर पुन्हा एक राज्यस्तरीय समिती चार महिन्यांपूर्वी स्थापन करण्यात आली. आता याही समितीचा अहवाल तयार झाला असून, तो मंत्रिमंडळापुढे ठेवला जाणार आहे. हा अहवाल आल्याबरोबर जिल्ह्यात एक एप्रिलपासून दारू सुरू होईल, अशी मोठी आशा तळीरामांना होती. त्यादृष्टीने अनेक बंद हॉटेल्स आणि बारच्या इमारतींची रंगरंगोटी सुरू झाली होती. पण आज सारेच “फुल” बनले.
2015
आठ कोटी 99 लाख 46 हजार 498 रुपयांची दारू पकडली. सहा हजार आरोपी अटकेत
2016
14 कोटी 46 लाख 46 हजार 256
2017
24 कोटी 53 लाख 62 हजार 767 ची देशी-विदेशी दारू पोलिसांनी पकडली. नऊ हजार 860 आरोपींना अटक.
2018
23 कोटी 20 लाख 52 हजार 632 रुपयांची दारू जप्त.
2019
22 कोटी 50 लाख 41 हजार 995 रुपयांची दारू पकडली. आठ हजार 80 आरोपीना अटक झाला.
2020
22 कोटी 1 लाख 76 हजार 975 रुपयांची दारू पकडली. चार हजार 944 तस्करांना अटक
2021
चालू वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याअखेर दोन कोटी 59 लाख 54 हजार 315 रुपयांची दारू पोलिसांच्या हाती लागली.
Comments
Loading…