in ,

Sonu Sood | अभिनेता सोनू सूदशी संबंधित 6 ठिकाणी आयकर विभागाची पाहणी

अभिनेता सोनू सूदच्या (Sonu Sood) मुंबईतील कार्यालयाचे आयकर विभागाकडून ‘सर्वेक्षण’ करण्यात येत आहे, असे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी दिल्ली सरकारच्या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमासाठी अभिनेता ब्रँड अॅम्बेसेडर बनल्यानंतर काही दिवसांनीच हा सर्व्हे करण्यात येत आहे. आयकर विभाग सकाळपासून सूद घरात चौकशी करत आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता सोनू सूदने नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. यानंतर दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, आज सोनू सूद संपूर्ण देशासाठी प्रेरणा बनला आहे. प्रत्येकजण जो त्याच्या घरी मदत मागण्यासाठी येतो, सोनू सूद त्याला मदत करतो. आज अशी अनेक सरकारं आहेत, जी काही करू शकत नाहीत, ते सोनू सूद करतो आहेत. आम्ही दिल्ली सरकारद्वारा काही खास उपक्रमांबद्दल सोनू सूदशी बोललो आहोत.

या पत्रकार परिषदेनंतर सोनू सूद राजकारणात येणार का ? हा प्रश्न निर्माण झाला होता परंतु पुढे जावून त्यावर पूर्णविराम लागला. केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये आम्ही ‘देश के मेंटर’ कार्यक्रम सुरू करणार आहोत. सोनू सूद देशाच्या मार्गदर्शक कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर असेल अशी माहिती दिली.

जाणून घ्या राजकारणाबद्दल काय आहे सोनू सूद चे मत
पक्षात सामील होण्यावर आणि निवडणूक लढवण्यावर सोनू सूद म्हणाला की, लोक नेहमी म्हणतात की तुम्ही चांगले काम करत आहात, राजकारणात या. मात्र कोणत्याही चांगल्या कामासाठी ते आवश्यक नसतं. मला ऑफर येतात, पण मी याबद्दल कधीच विचार केला नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वाहन चालकांऐवजी नगरपरिषदेकडून दंड वसूल करण्याची मागणी

IPL 2021 मध्ये आता प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये उपस्थित राहून मॅच पाहता येणार