in

परमबीर सिंग यांना ९ जूनपर्यंत अटक न करण्याचे राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन

ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी अंतरिम दिलासा दिला होता. साेमवार, २४ मे पर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाता ९ जूनपर्यंत ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र, तोपर्यंत परमबीर यांनी तपासयंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करावं, अशी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात विनंती केली आहे.

शुक्राची झालेल्या सुनावणीदरम्यान या याचिकेवर सुनावणी प्रलंबित असताना, आम्ही राज्य सरकारला त्यांना अटक न करण्याची सूचना करत आहोत. मात्र, ते ही सूचना विचारात घ्यायला तयार नसल्याने, आम्ही याचिकाकर्त्यांना येत्या सोमवारपर्यंत अटक न करण्याचे सरकारला निर्देश देत आहोत, असे न्या.एस.जे. काथावाला व न्या.एस.पी.तावडे यांच्या खंडपीठाने म्हटले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबई लोकलवर निर्बंध आवश्यक; विजय वडेट्टीवार

आता देशात Yellow Fungus ची पहिली केस, इतर दोन्ही फंगसपेक्षा जास्त घातक