in

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; राज्य सरकार महामंडळाला ६०० कोटी देणार

एसटी महामंडळाला राज्य शासन ६०० कोटी रुपयांची मदत देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे. यामध्ये ९८ हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणे शक्य होणार आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

कोरोना महामारीमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनचा एसटीच्या महसुलावर मोठा परिणाम झाला. अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फक्त ५० टक्के आसन क्षमतेने बसेस चालू ठेवण्याचे बंधन घातले होते. त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या तिकीट महसुलावर झाला होता.

एसटी महामंडळ यामुळे तोट्यात धावत होते. यासाठी मंत्री परब यांनी एसटी महामंडळातर्फे शासनाकडे आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या बाबतचे सादरीकरण आज उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना करण्यात आले. त्यावेळी कर्मचा-यांचे वेतन व इतर दैनदिन खर्चासाठी ६०० कोटी रुपये पहिल्या टप्यात देण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी मान्य केले. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला थोडा दिलासा मिळाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”पंतप्रधानांनी दाढी करावी”…चहावाल्यानं केली १०० रुपयांची मनीऑर्डर…

मालाडमध्ये कोसळली इमारत; 11 जणांचा मृत्यू