in ,

Corona Vaccination: राज्य सरकार मोफत लसीकरण करणार, नवाब मलिक यांची माहिती

राज्य सरकारतर्फे 18 ते 45 वयोगटातील प्रत्येक नागरिकाचे मोफत लसीकरण करण्यात येईल. सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. या लसीकरणासाठी जागतिक टेंडर मागवण्यात येणार असून जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे, असंही ते म्हणाले.

नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत या विषयावर चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (शनिवारी) जाहीर केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

केंद्र सरकारने 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे 45 वयाच्या खालील लोकांना केंद्रसरकार लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान कोविडशील्ड केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगींना ६०० रुपये राहणार आहे. कोवॅक्सीनची किंमत सुध्दा ६०० रुपये राज्यांना व १२०० रुपये खाजगींना जाहीर झाली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तुझं डोकं ठिकाणावर आहे का ? म्हणतं नेटीझन्सने कंगनाला घेतले फैलावर

‘लोकांनी मालदीवला एक तमाशा बनवला आहे’ ; परदेशी गेलेल्या सेलिब्रिटींना नवाजुद्दीनने झापलं