in

Maharashtra Unlock : महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक केलेला नाही; वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर राज्य सरकारचं स्पष्टीकरण!

राज्यात ५ टप्प्यांत अनलॉकची करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. या घोषणेनंतर राज्य पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे. (जाणून घेऊयात कोणते जिल्हे झालेत अनलॉक ? काय बंद आणि काय सुरू राहणार)

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात  काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे,या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन  पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात  या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासन निर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येणार आहे. अशारीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.

या प्रकारामुळे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये एकवाक्यता दिसून येत नसल्याची टीका आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच श्रेयवादासाठी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु असल्याची बोलले जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Unlock : जाणून घेऊयात कोणते जिल्हे झालेत अनलॉक ? काय बंद आणि काय सुरू राहणार

Maharashtra Unlock | आता लवकरच शुटिंग होणार सुरु