in ,

उद्यापासून सातारा जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन जाहीर

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाचा पाॅझिटीव्हचा दर वाढलेला त्याचबरोबर मृत्यदरही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवरील वाढणारा ताण कमी करण्यासाठी सातारा येथे जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक पूर्ण झाली आहे. उद्यापासून (दि.4 मे) कडक लाॅकडाऊन लावण्यात येणार आहे असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊन लावलेला आहे. मात्र तरीही कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. तेव्हा उद्यापासून कडक लाॅकडाऊन लावण्यात येणार आहे. त्यासंबधी पोलिस यंत्रणा, मुख्याधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी हे सध्याकाळी नियमावली जाहीर करणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंगांनी आमच्याकडून खंडणी उकळली; क्रिकेट बुकी सोनू जालानचा आरोप

गांधीविचारक सुमनताई बंग यांचे निधन