in

उल्हासनगरात हजारो विद्यार्थ्यांची अग्निसुरक्षा धोक्यात !

‘मनविसे’कडून माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती उघड

मयुरेश जाधव
उल्हासनगर शहरात एकूण २२२ शाळा-महाविद्यालयं आहेत. यापैकी फक्त १३ शाळा आणि महाविद्यालयांनी अग्निशमन विभागाकडून फायर एनओसी मिळवली आहे. उर्वरित २०९ शैक्षणिक संस्थांची अग्निसुरक्षा वाऱ्यावर असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये.

मनसेच्या विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी माहितीच्या अधिकारात याबाबतची माहिती मागवली होती. त्यांना अग्निशमन विभागाने दिलेल्या उत्तरात ही चिंताजनक बाब उघड झाली. याहून धक्कादायक बाब म्हणजे या २०९ शाळा-महाविद्यालयांपैकी काही शाळा आणि महाविद्यालयं ही एखाद्या इमारतीच्या गच्चीवर किंवा बेसमेंटमध्ये आहेत, येण्या-जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे, स्त्यामध्ये उघड्या पडलेल्या वायर्स आणि अरुंद जागा आहेत. अशा ठिकाणी फायर एक्झिट नसल्यानं आग लागली, तर हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या याकडे दुर्लक्ष केल्यास शैक्षणिक संस्था आणि महापालिका अधिकारी यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचा इशारा मनोज शेलार यांनी दिला आहे. दरवेळी एखादी आगीची मोठी घटना घडल्यानंतर अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येतो. मात्र कालांतरानं त्याकडे दुर्लक्ष होतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…म्हणून खासदार इम्तियाज जलील भडकले

अहमदनगरचे पालकमंत्री पद सोडण्याबाबत हसन मुश्रीफ यांचा दुजोरा