in

सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला घरचा आहेर; म्हणाले…

देशात ऑक्सिजनचा तुटवडा नसून, मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा मोदी सरकारकडून वारंवार केला जात आहे. या मुद्द्यावरून भाजपाचे नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला सुनावलं आहे. भाजपाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

स्वामी यांनी ऑक्सिजन टंचाईच्या मुद्द्यावरून एक ट्विट केलं आणि सरकारला संसदेच्या स्थायी समितीने दिलेल्या इशाऱ्याची आठवण करून दिली. “देशात किती ऑक्सिजन उपलब्ध आहे, हे सांगणं सरकारनं बंद करावं. पण, आम्हाला हे सांगावं की, किती जणांना ऑक्सिजन देण्यात आला आणि कोणत्या रुग्णालयांना देण्यात आला

ऑक्टोबर २०२०मध्ये संसदेच्या आरोग्यविषयक स्थायी समितीने ऑक्सिजन सिलेंडर उत्पादन आणि पुरवठ्याचा तुटवडा असल्याचा इशारा दिला होता. पण, तरीही सरकार त्रस्त झालं नाही,” असं म्हणत स्वामी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अनिल देशमुखांची उच्च न्यायालयात धाव; गुन्हा रद्द करण्याची मागणी

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी