in

अँटिबॉडी कॉकटेलच्या वापरामुळे 24 तासांत कोरोना लक्षणे गायब

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर आता देशात ओसरत चालला आहे. देशभर लसीकरण मोहिमेनेही वेग घेतला आहे. तसेच नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध होणार आहेत. या पार्श्वभूमीवर येथील ‘एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी’ या संस्थेने ४० हून अधिक कोरोनाबाधितांवर मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचा केलेला प्रयोग यशस्वी ठरल्याचे आढळून आले आहे.

अँटिबॉडी कॉकटेलचा डोस घेताच पहिल्याच दिवशी बाधितांमधील लक्षणे गायब झाली. यामुळे रुग्णांना कोरोनातून बरे करण्यासाठी आणखी एक चांगला पर्याय मिळू शकणार आहे. अशा प्रकारे कोरोनावर उपचार करता येऊ शकतो याची चाचपणी गेले अनेक दिवस देशात विविध ठिकाणी सुरू होती. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या औषधाचा वापर करावा, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे असून याचा अतिवापर टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

  • मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचा एक डोस बाधितांना कोरोनाची लागण झाल्यावर तीन ते सात दिवसांच्या आत दिला जातो. या कॉकटेलमध्ये कासिरिव्हिमॅब आणि इंडेव्हिमॅब या दोन औषधांचा समावेश केलेला असतो.
  • भारतात या औषधाची किंमत ७० हजार रुपयांहून अधिक आहे. उल्लेखनीय म्हणजे किंमत अधिक असूनही या अँटिबॉडी कॉकटेलच्या मागणीत वाढ होताना दिसून येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लोकल प्रवासाची मुभा न मिळाल्याने शिक्षक संकटात

मराठा आरक्षण : शाहू जयंतीला औरंगाबादेत शिवसंग्रामचा मेळावा