in ,

ऑक्सिजन पुरवठ्यावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावलं!

देशात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज(शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयात ऑक्सिजन पुरवठा, औषध पुरवठा व इतर धोरणां संबंधीच्या मुद्यांवर सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी ऑक्सिजन पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत एक अशी व्यवस्था बनवली जावी, ज्याद्वारे लोकांना कळाले पाहिजे की ऑक्सिजनचा किती प्रमाणात पुरवठा केला गेला आहे आणि कोणत्या रूग्णालयात किती ऑक्सिजन उपलब्ध आहे.

तसेच, न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, ”आम्ही हे देखील ऐकत आहोत की, नागरीक ऑक्सिजन सिलिंडरसाठी रडत आहेत. दिल्लीत खरोखर ऑक्सिजन उपलब्ध नाही, गुजरात, महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे. सरकारला आम्हाला हे सांगाव लागेल की आज आणि सुनावणीनंतरच्या दिवसापासून परिस्थीतीत काय फरक पडेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वरिष्ठ वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं निधन

Jagdish Lad | मि. इंडिया बॉडीबिल्डर जगदीश लाडचं कोरोनाने निधन