in

सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा ‘हा’ फोटो टि्वट करत काय म्हटलंय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा शस्त्रक्रीयेनंतरचा रुग्णालयातील एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. सुप्रिया सुळे यांनी हा फोटो टि्वट केला आहे. फोटो शेअर करत सुप्रिया यांनी लिहिलं आहे की, ‘सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारिका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत’.

पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानं शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. पवार यांच्या पित्त मालिकेतला खडा आज पहाटे बाजूला केला आहे, मात्र पित्ताशयावर सूज आहे. विविध तपासण्या चालू आहेत. पित्ताशयावरील सूज कमी झाल्यानंतरच त्यांचे ऑपरेशन होणार आहे अशी माहिती हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर पवारांना दहा दिवस रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गडबड घोटाला ! भाजपाच्या प्रचार व्हिडिओत चिदंबरम यांच्या सुनेची डान्स क्लिप

Balasaheb Thackeray Memorial | भूमिपूजन निमंत्रणावरुन राजकीय टीका