in

…म्हणून फडणवीसांच्या पुतण्याला मिळाली लस; RTI मधून माहिती उघड

देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने लस घेतल्याचं प्रकरण बरंच गाजलं होतं. फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस हा तेव्हाच्या वयाच्या अटीमध्ये बसत नसून देखील त्याला लस देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. यावरून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांनी टीका केली होती.

तन्मय फडणवीस याने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याची बाब आता समोर आली आहे. बारामतीमधील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळवली आहे. तसेच, तन्मय फडणवीसच्या ट्विटर अकाउंटवर त्याने Actor असा प्रोफाईल इन्फो लिहिलेला असताना त्याला आरोग्य कर्मचारी म्हणून लस कशी मिळाली? असा प्रश्न नितीन यादव यांनी उपस्थित केला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी यासंदर्भात २१ एप्रिल २०२१ रोजी यासंदर्भातल्या माहितीची मागणी करणारा अर्ज मुंबईतल्या सेव्हन हिल्स रुग्णालयात केला होता. त्यासंदर्भात ४ जून २०२१ रोजी माहती पुरवण्यात आली असून त्यामध्ये यासंदर्भातला खुलासा करण्यात आला आहे. याच सेव्हन हिल्स रुग्णालयात तन्मय फडणवीस याने कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला होता. पहिल्या डोसनंतर मिळालेले प्रमाणपत्र दाखवून नागपूरमध्ये त्याने दुसरा डोस घेतला होता. मात्र, त्याला पहिला डोस कशाच्या आधारावर देण्यात आला? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. त्यावर आता या माहिती अधिकारांतर्गत खुलासा झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘मोदींनी सांगितले तर वाघाशीही दोस्ती करू’

चिखलदऱ्यात पसरली धुक्याची चादर; 3 दिवसांपासून विदर्भाच्या काश्मीरात पाऊस