in

फायनल! दहावी आणि बारावी परीक्षा होणार वेळेतच आणि त्याही ऑफलाइन!

कोरोना संसर्गाची दुसरी ला़ट राज्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या पुढेच आहे. अशा परीस्थितीत दहावी आणि बारावी परीक्षेचे काय होणार, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम होता. पण शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज हा संभ्रम दूर केला. विद्यार्थ्याची वाढती मागणी लक्षात घेता इयत्ता १० वी आणि १२ वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

या दोन्ही बोर्ड परीक्षा येत्या एप्रिल अखेर पासून सुरू होतील. तसेच या परीक्षांसाठी वेगळी परीक्षा केंद्रे देण्यात येणार नाहीत. विद्यार्थ्यांना त्यांचीच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय हेच केंद्र असेल, असे गायकवाड यांनी सांगितले. तर, दहावी, बारावीची प्रात्याक्षिक (प्रॅक्टिकल) परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

30 मिनिटे अधिकची
विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटे अधिकची देण्यात येणार आहेत. म्हणजेच लेखी परीक्षेसाठी एकूण साडेतीन तासांचा कालावधी मिळणार आहे. वर्षभर विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असल्याने त्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. हे ध्यानी घेऊन त्यांना अधिकचा वेळ देण्यात आला आहे.

विद्यार्थ्याची वाढती मागणी लक्षात घेता इयत्ता १० वी आणि १२ वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

काय म्हणाल्या शिक्षणमंत्री वर्षा गायकडवाड?

इयत्ता १० वी ची लेखी परीक्षा या पूर्वी घोषित केल्याप्रमाणे २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीमध्ये तर  इ. १२ वी ची परीक्षा दि.२३ एप्रिल  ते २१ मे २०२१ या कालावधीत  ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येणार असून पालक आणि विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाणे सोयीचे होणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेतील परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल, असेही श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.

विशेष परीक्षा

एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेनमेंट झोन, संचारबंदी आदी कारणांमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यामध्ये विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. ही परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.

लेखी परीक्षेसाठी मिळणार वाढीव वेळ

 दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३ तास वेळ दिला जात असे. परंतु यावर्षी विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ४० व ५० गुणांच्या परिक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी २० मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल.

प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी गृहपाठ

 इ. १० वी च्या प्रात्यक्षिक परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात परंतु या वर्षी कोविड-१९ परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य (Assignment) गृहपाठ पध्दतीने घेण्यात येतील. प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी विशिष्ट लेखनकार्य, गृहपाठ पध्दतीने २१ मे ते १० जून २०२१ या कालावधीत सादर करावे लागणार आहे. इ. १२ वी च्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा दि. २२ मे २०२१ ते १० जून २०२१ या कालावधीत होतील. कोविड -१९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे १२ वी च्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून ५ ते ६ प्रात्यक्षिकावरच परीक्षा घेण्यात येईल व त्या संदर्भात माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल, असेही श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.

विशिष्ट परिस्थितीत गृहपाठ सादर करण्यासाठी मुदतवाढ

कला/वाणिज्य/ व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परिक्षेनंतर १५ दिवसात गृहपाठ सादर करावेत. इ.१० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांस अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कन्टेमेंन्ट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषयक परिस्थितीमुळे, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा गृहपाठ सादर करण्यासाठी १५ दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल. परीक्षा मंडळामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट मध्ये घेण्यात येईल. ही परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील, अशी माहिती श्रीमती गायकवाड यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एनआयएकडे!

असंच काहीसं आवडलेलं…