in

ठाकरे सरकार महाराष्ट्राची बदनामी करतायत – आशिष शेलार

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची मालिका सुरु करणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौऱ्यावर पोलिसांना बंदी घातली आहे. किरीट सोमय्या यांच्या मुंबईतील घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर येऊ नये म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान यावर आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पहायला मिळत आहे. भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकार महाराष्ट्राची बदनामी करतय असे यावेळी परिषदमध्ये म्हणाले

‘घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी कोल्हापूरला निघणाऱ्या भाजपा नेते किरिट सोमय्या यांना घरातच पोलिसांनी कैद करुन ठेवलेय,त्यापुर्वी गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाला जाण्यासही मज्जाव करण्यात आलाय, हा ठाकरे सरकारच्या ठोकशाहीचा कळसच आहे. सोमय्या बोलायला लागल्यावर एवढी का भिती वाटते?’ असा सवाल देखील शेलार यांनी यावेळी ठाकरे सरकारला केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IPL 2021 च्या प्रक्षेपणावर तालिबानची बंदी

3 दिवसांत मुंबईसह पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता