in

नालासोपाऱ्यात ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदानाला सुरुवात…दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

संदीप गायकवाड | नालासोपारा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या मतदानाला आज सुरुवात झाली आहे. यामध्ये दुपारी साडे बारा वाजेपर्यंत वसई तालुक्यात 648 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान अद्याप 4 वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहणार असून नेमका विजय कोणाचा होतो याकडे लक्ष लागले असून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत एकूण 21 उमेदवारांपैकी बहुजन विकास आघाडी सहकार पॅनलचे 5 उमेदवार तर 1 उमेदवार महाविकास परिवर्तन पॅनलचा आहे. एकूण 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.आता उरलेल्या 15 उमेदवारासाठी आज मतदान सुरू आहे. वसई तालुक्यात तीन ठिकाणी हे मतदान पार पडत आहे.नालासोपारा पश्चिम समेळ पाडा, सोपारा इंग्लिश स्कुलमध्ये आज सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत हे मतदान सुरू आहे.दुपारी साडे बारा वाजेपर्यंत वसई तालुक्यात 648 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी सहकार पॅनलचे उमेदवार व महाविकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवारात थेट लढत आहे. दरम्यान महाविकास परिवर्तन पॅनल आणि सहकार पॅनल या दोन्ही गटातील उमेदवारांनी आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. मात्र आता मतदार कुणाला कौल देतात हे निकालाअंती स्पष्ट होणार आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

छाया साखरे यांचा राज्यस्तरीय ‘आय टी गोल्डन ग्लोब अवॅार्ड’ने सन्मान

Deepali Chavan Suicide Case | अखेर श्रीनिवास रेड्डी निलंबित