in

मोर्शीच्या चाके कुटुंबीयांवर कोसळली नियतीची कुऱ्हाड; 17दिवसात आई,वडील व दोन मुलांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील मोर्शीच्या रामजीबाबा नगर येथील रहिवासी नागोराव चाके यांच्या कुटुंबातील चार जणांचा अवघ्या 17 दिवसात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. तिघांचा नैसर्गिक रित्या तर एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

नागोराव दौलतराव चाके (९१) आपल्या कुटुंबासोबत मोलमजुरी करून आपला प्रपंच चालवत होते. नागोराव यांना चार मुले, व दोन मुली असून सर्वजण विवाहित आहेत. त्यापैकी त्यांची दोन मुले मोर्शी ला त्यांच्याजवळ राहत असून उर्वरित दोघेजण खेरडा ता. कारंजा व पुणे येथे राहतात. दिनांक 25 एप्रिल रोजी नागोराव यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे वय ९१ वर्षाचे होते. नागोराव हे वयोवृद्ध असल्याने व त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नसल्याने त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचे गृहीत धरून परिवारातील लोकांनी त्यांचे सर्व सोपस्कार पार पाडले. तिथून अवघ्या सात दिवसात त्यांच्या पत्नी कमलाबाई (८१) या आजारी पडून देवाघरी गेल्या.

तेव्हा मात्र त्यांचा मुलगा दशरथ (५१) हासुद्धा आजारी होता त्याचेवरही अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. आईचे निधन झाल्याच्या अवघ्या सात दिवसाच्या अंतराने दशरथचे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असतानाच निधन झाले. त्याचवेळी नागोराव चाके यांचा द्वितीय चिरंजीव मनोहर (५२) जो खेरडा ता. कारंजा येथे राहतो तो अमरावती येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये कोरोना ने आजारी असून उपचार घेत होता. त्याची प्रकृती गंभीर असल्याने अवघ्या चार दिवसात मनोहर चा पण मृत्यू झाला. व दशरथ तसेच मनोहर या कर्त्या माणसाचा मृत्यू झाल्याने या परिवारा समोर उदर निर्वाह चा प्रश्न निर्माण झाला.

पाहता पाहता हसत्या खेळत्या या कुटुंबातील चार जणांच्या झालेल्या अकाली मृत्यूने या संपूर्ण कुटुंबीयांवर जणू नियतीची कुऱ्हाड कोसळली. नागोराव चाके व त्यांच्या पत्नी कमलाबाई मोलमजुरी करून आपला चरितार्थ चालवत असताना.ज्यावेळी उर्वरित कुटुंबियांना समाजातून मानसिक आधाराची गरज असते. त्यावेळी कोरोनाच्या धाकाने त्यांना आधार देण्यास कोणी पुढे सरसावत नसल्याने उर्वरित कुटुंबीयांची मात्र फरपट होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

PNB घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सी 3 दिवसांपासून बेपत्ता

मुंबई मनपाच्या ग्लोबल टेंडर आजचा शेवटचा दिवस