in

यास चक्रीवादळ आज पश्चिम बंगाल, ओडिशात धडकणार

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, यास चक्रीवादळ आज सकाळी 10 नंतर पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. बालासोर आणि भद्रकजवळच्या धामरा जवळून हे चक्रीवादळ सरकणार आहे. चक्रीवादळामुळे ताशी 130 ते 140 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचना आधीच देण्यात आल्या आहेत.

चक्रीवादळामुळे समुद्रात दोन ते तीन मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. मेदिनीपूरसह पश्चिम बंगालमधील दक्षिणेकडील जिल्हे तसंच ओदिशाच्या बालासोर आणि भद्रक या भागांमध्ये पाणी भरू शकतं. चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड याठिकाणी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ओदिशाच्या भद्रक, जगतसिंहपूर, कटक, बालासोर, ढेंकानाल, जयपूर, मयुरभंज, केंद्रापडा, क्योंझर इथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर पश्चिम बंगालमधल्या दक्षिण 24 परगण्यात बांकुरा, झारग्राम तसंच मेदिनीपूर इथे जोरदार हवेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोलकाता आणि नदिया या भागांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शरद पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानाची सुरक्षा वाढवली

‘शरद पवार’ यांच्या गोविंद बाग निवासस्थानाची सुरक्षा वाढवली