in

The family man 2 |’द फॅमिली मॅन 2′ ची दमदार एन्ट्री

बहुचर्चित असा मनोज वाजपेय स्टारर ‘द फॅमिली मॅन २’ या विकेंडला तुमच्या भेटीला येतोय. ‘द फॅमिली मॅन २’ ही बहुप्रतिक्षित वेब सीरिज २ तास आधी प्रदर्शित झाल्याने चाहत्यांनी त्यांचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. ‘द फॅमिली मॅन २’ अ‍ॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. अनेकांनी ट्वीट करत अॅमेझॉन प्राइमचे आभार मानले . तर काही नेटकरी म्हणाले की वेब सीरिज तामिळ आणि तेलुगू भाषेत नाहीये या गोष्टीवर नाराजी व्यक्त केली आहे .

‘द फॅमिली मॅन’ वेब सीरिजचा पहिला सीजन मनोज वाजपेयी यांचे डायलॉग आणि अभिनयामुळे प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला होता. पहिल्या सीझनच्या कथानकामध्ये श्रीकांतने म्हणजे मनोज वाजपेयी दिल्लीला गॅस अटॅकपासून वाचवलं होतं. द फॅमिली मॅन २ मध्ये मात्र श्रीकांत एनआयएच्या टीममधून बाहेर पडला आपल्याला दिसतो आणि एका आयटी कंपनीत नोकरी करतोय. श्रीकांत स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या बॉसच्या ऑर्डर फॉलो करतोय, आयुष्यातले थ्रील संपल्याने ते एकदम कंटाळवाणे झालेय. पण पत्नीला खूश करण्याचा प्रयत्न करतोय.

अशात सहकारी तळपदे त्याला त्याच्या कामाची आठवण करून देतो. पण श्रीकांत वेळोवेळी स्वत:च्या मनाला मारून मुटकून समजावत असतो. अर्थात तळपदेकडून टास्क अपडेट घेण्याची त्याची सवय सुटत नाहीच. अशात काही असे घडते की, श्रीकांतला पुन्हा एकदा अ‍ॅक्शनमध्ये यावे लागते. तो पुन्हा मिशनवर निघतो. तामिळनाडू, श्रीलंकेमार्गे ही कथा लंडनमध्ये पोहोचते. ही कथा साऊथ स्टार सामंथाबद्दलही आहे. ती पहिल्या सिझनमध्ये नव्हती. दुस-या सिझनमध्ये मात्र तिची दमदार भूमिका आहे. श्रीकांत गुंडांना कशी मात देतो, मिशनचा शेवट कसा होतो, यासाठी अर्थातच तुम्हाला 9 एपिसोडची ही सीरिज पाहावी लागेल.

सिरीजच्या नाव प्रमाणे श्रीकांतच्या फॅमिली लाईफवर या सीझनमध्ये जरा अधिक फोकस केला गेला आहे आणि कथेच्यादृष्टीने ती गरज आहे. पण म्हणून थ्रील आणि सस्पेन्सचीही कमतरता नाही. दिग्दर्शक मास्टर राज व डीके यांनी या सीझनचे फक्त चार एपिसोड दिग्दर्शित केले आहेत. यात पहिल्या, दुस-या, सहाव्या व नवव्या एपिसोडचा समावेश आहे. उर्वरित पाच एपिसोड सुपर्ण एस. वर्मा यांनी दिग्दर्शित केले आहे. प्रत्येक एपिसोड दमदार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Global Tender; मुंबई महापालिकेचे ग्लोबल टेंडर रद्द

‘5जी विरोधातील याचिका पब्लिसिटी स्टंट’ , जुही चावलाला 20 लाखाचा दंड