in

विरार रुग्णालयातील घटना अतिशय दुर्दैवी

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. या आगीत 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे अशी भावना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

“प्राथमिक स्तरावर पाहता ही दुर्घटना असल्याचं समजतंय. अचानकपणे एसीचा स्फोट झाल्याने केवळ दोन ते तीन मिनीटात सर्वत्र धुर पसरला. त्यामुळे रुग्णांना वाचवायला वेळ कमी मिळाला. दरवाज्याच्या जवळील चार रुग्णांना वाचवण्यात यश आलं आहे.”

हा स्फोट का झाला. कसा झाला याची चौकशी करण्यात येईल असं सांगत राजेश टोपे म्हणाले की, “या घटनेवर शासनस्तरावर योग्य ती मदत केली जाईल. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने दवाखान्यांना हातही लावता येत नाहीत. पण फायर ऑडिट, ऑक्सिजन ऑडिटचे आदेश सर्व रुग्णालयांना देण्यात आले आहेत.”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दिल्लीत ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यानं २५ रुग्णांचा मृत्यू

Mansukh Hiren Case | पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक