in ,

दिलासादायक ! नवीन रुग्णवाढीचा आकडा घटला

राज्यात कोरोना विस्फोटानंतर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन व जमावबंदी लागू करण्यात आली. या निर्बंधानंतर आता कुठेतरी नवीन रुग्णवाढीचा आकडा आटोक्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूवी 40 ह्जाराच्या टप्प्यावर पोहोचलेला आकडा आज 28 हजारापर्यत पोहोचला आहे. त्यामुळे कुठेतरी हा दिलासा म्हणता येईल.

आज दिवसभरात राज्यात 27 हजार 918 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 139 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 1.96 टक्के आहे. आजपर्यंत एकूण 54 हजार 422 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण 3 लाख 40 हजार 542 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

23 हजार 820 रूग्ण कोरोनातून बरे झाले असून राज्यात आजपर्यंत एकूण 23 लाख 77 हजार 127 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.71 टक्के एवढे झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजप खासदाराच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची चर्चा…

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं उद्या भूमिपूजन