in

जनतेने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले

“पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची दोन तृतीयांश मतदानाकडे सध्या वाटचाल सुरू आहे अशा स्वरूपाचं चित्र आहे. पश्चिम बंगालची निवडणूक भाजपाने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पश्चिम बंगालच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजपाचे देशभरातील प्रमुख पदाधिकारी तिथे गेले होते.

या ना त्या प्रकारे पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता स्थापन करावी यासाठी भाजपा मैदानात उतरली होती. परंतू पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी भाजपाला सत्तेपासून जनतेने दूर ठेवलं आहे,” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी त्यांनी लोकांच्या भल्यासाठी तसंच करोनाशी लढण्यासाठी एकत्रित काम करुया असंही म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ममता बॅनर्जी झाशीच्या राणी प्रमाणे लढल्या – छगन भुजबळ

RR Vs SRH | सनरायजर्स हैदराबादचा गोलंदाजीचा निर्णय