in

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला पुरातन रुप देण्यासंदर्भात आराखडा आज ठरणार

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला पुरातन रुप देण्यासाठी आराखडा बनवण्यात आला आहे. विठुरायाच्या राउळीला 700 वर्षांपूर्वीचे मूळ रूप देण्याच्या आराखड्याबाबत आज अंतिम बैठक होणार आहे. यासाठी अंदाजे 40 ते 45 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या आराखड्याला अंतिम मान्यता आजच्या बैठकीत दिली जाईल.

आज होणाऱ्या बैठकीस पुरातत्व विभाग, मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाचे आर्किटेक्चर प्रदीप देशपांडे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर अंतिम मंजूर केलेला हा आराखडा परवानगीसाठी विधी आणि न्याय विभागाकडे सादर केला जाणार आहे.

या कामामध्ये रासायनिक प्रक्रियेने विठ्ठल मंदिराचे मजबुतीकरणाला साधारण साडे आठ कोटी रुपये एवढा खर्च होणार असून मंदिराच्या स्ट्रक्चरल मजबुतीकरणाला साडेचौदा कोटी खर्च होणार आहे. विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही यासाठी साडे सहाकोटी खर्च अपेक्षित आहे. याशिवाय नव्याने उभ्या कराव्या लागणाऱ्या वास्तूसाठी साडे अकरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकंदर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना मंदिराची आर्थिक परिस्थिती पाहून प्राधान्यक्रम ठरवून ही कामे हाती घेतली जाणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लावणी कलाकार स्वप्निल विधाते भारत गौरव पुरस्काराने सन्मानित

प्रवाशांच्या जीवाशी खेळणं भोवलं; ST चालक अखेर निलंबित