in

चक्क पोलिसाची वर्दीच चोरीला, ‘वर्दी’ देणार कोणाला ?

भंडारा पोलिसात कार्यरत पोलिस शिपायाची वर्दीच त्याच्या घरुन चोराने चोरुन नेल्याच्या धक्कादायक प्रकार भंडारा शहरात उघड़ झाला असून ह्या प्रकरणी भंडारा शहर पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस शिपाई कौशिक गजभिये असे वर्दी चोरीला गेलेल्या शिपायाचे नाव असुन भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात कार्यरत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात कार्यरत पोलिस शिपाई कौशिक गजभिये हे भंडारा शहरात संत तुकडोजी वार्ड,एल आय सी ऑफिस च्या मागे राहत असून 5 जून ला घटनेच्या दिवशी मध्यरात्री ते आपल्या कर्तव्या बजावत होते . त्याच्या घरातील मेनगेट व जिन्याची गेट खोलून अज्ञात चोराने आत प्रवेश करत जूनी वापरती खाकी रंगाची वर्दी -पैंट, नावाची नेम प्लेट, शर्ट वरील पोलिस टैग, बक्कल नंबर असलेली बेल्ट किम्मत 1हजार 500 रुपये व 200 रुपये किंमतीची बैग व खाली असलेल्या रुँम च्या टाला तोडून 300 रुपये चोरुन नेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व प्रकार उघडकीस आला. ह्याघटनेची माहिती पोलिस शिपाई गजभिये यांनी वरिष्ठना दिली असून भंडारा शहर पोलिसात अज्ञात चोरा विरुद्ध तक्रार देत गुन्हा नोंद केला आहे. या सर्व घटनेनंतर भंडारा जिल्ह्यात आता पोलिसांचा धाक राहिला नाही का ??? हा प्रश्न उभा राहत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Fire In Pune | पुण्यातील मुळशीच्या सॅनिटायझर कंपनीला आग… १८ जणांचा मृत्यू

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र अव्वल; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती