देशातल्या कोरोना संदर्भातील आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. बैठकीत कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव डॉ. विनोद पॉल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळाली आहे.देशातल्या कोरोना संदर्भातील आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. बैठकीत कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव डॉ. विनोद पॉल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळाली आहे.
संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून, देशभरात मागील २४ तासांत ९३ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, नव्या वर्षातील सर्वात मोठी रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे. त्याचबरोबर २४ तासांच्या कालावधीत पाचशेहून अधिक रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांतील करोना रुग्णसंख्येचा आणि लसीकरणाची माहिती प्रसिद्ध केली आहे. देशभरात २४ तासांत ९३ हजार २४९ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर ५१३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याच कालावधीत ६० हजार ४८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या देशात ६ लाख ९१ हजार ५९७ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १ लाख ६४ हजार ६२३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Comments
Loading…