in

रिंगरोड प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्ण होणार – श्रीकांत शिंदे

खासदार डॉ श्रीक्रांत शिंदे आज कल्याणच्या दौर्यावर असताना एमएमआरडीए व केडीएमसी अधिकार्यासामवेत कल्याण डोंबिवली शहरांची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा ,कल्याणातील दुर्गाडी ते टिटवाळा या टप्पा क्रमांक ४ ते ७ ची पाहणी केली व वर्षभरात बहुप्रतीक्षेत असणारा रिंगरोड वाहतुकीसाठी खुला होईलासा विश्वास खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

गेली पाच वर्षापासून सुरु असलेला रिंगरोड च्या सात टप्प्यातील कामाला चांगलीच गती मिळताना दिसत आहे अनेक वर्ष डोंबिवली कारानला अनेक वर्ष वाहतूक कोंडीचा नाहक त्रासाला बळी पडत होते पण रिंगरोड च्आच्ताया १ ते ७ या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यावर हेच कल्याण ते टिटवाळा अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार होण्याची शक्यता आहे. भविष्यात अंतिम टप्पा जेथे संपतो तेथून ८वा टप्पा सुरु करण्याचा शासनाचा हेतू आहे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

रस्ता ३ ते ८ या टप्प्याचे मोठ्या प्रमाणात जोडरस्ता होणार आहे .अनेत वर्ष तेथून वाहतूक करणे कठीण होते .वाढत्या वाहतुकीमुळे ट्राफिक जाम ची समस्या भरपूर होती त्यामुळे असा प्रकल्प राबवणे अत्यंत गरजेचे होते. कल्याण डोंबिवली मध्ये प्रवेश करणारे रस्ते बॉटलनेक झाल्याने वाहतूक कोंडीच्या त्रासाला आणखीन भर पडली होती मात्र पत्रीपुल्काचे काम पूर्ण झाल्याने काहीसा दिलासा मलताना दिसतोय तसेच दुर्गाडी,कल्याण ,शिळरोड सहा पदारीकारनाचेकाम शेवटच्या टप्प्यात असून आता दुधात साखर म्हणून रिंगरोड ही येत्या वर्षभरात पूर्ण होतोय त्यच जोडीला काटई ते ऐरोली भुयारी मार्गाचे कामाचा मेगा प्रोजेक्ट येत्या २ वर्षात पूर्ण होईल व मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध होऊन वाहतूक कोंडीची समस्या कायमची साम्पुस्तात येईल असा विश्वास डॉ. श्रीकांत शिंदे यांची दिला .

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तामिळनाडूमधील खळबळजणक घटना, कोरोनाने सिंहाचा मृत्यू

मान्सून तीन दिवसांत राज्यात दाखल होण्याचा अंदाज