in ,

राज्यातील लॉकडाउन 15 जूनपर्यंत वाढवणार; राजेश टोपेंचे संकेत

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 1 जून पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र यावेळी लॉकडाऊन वाढवण्याच्या मुद्यावर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, पंधरा दिवसांपेक्षा जास्त लॉकडाऊन वाढवला जाणार, पण यावर अंतिम निर्णय व्हायचा आहे. गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदच राहणार, ज्या जिल्ह्यात प्रमाण कमी झालं आहे तिथं काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

कोरोना उपचाराचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही तर काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे यासंबंधीच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जावे असा आमचा प्रयत्न आहे. आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राजेश टोपे त्यांच्या साखर कारखान्याच्या कामासाठी साखरसंकूलमध्ये आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

 • पुण्यात परिस्थिती समाधानकारक; 9.11 पॉझिटिव्हिटी रेट आहे
 • राज्यात ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग वैज्ञानिक पध्दतीने व्हायला हवे
 • टेस्टिंग ची संख्या कमी होता नये
 • पुण्यात सर्वात जास्त चाचण्या, त्या तश्याच राहिल्या पाहिजे. होम आयसोलेशन कमी झाले पाहिजे इन्स्टिट्युशनल आयसोलेशन वाढले पाहिजे
 • गावांमध्ये कोव्हिड केअर सेंटर उघडले पाहिजे
 • प्रत्येक बिल तपासलं पाहिजे
 • प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑडिटर हवा आहे
 • पुणे प्रशासनाने 9 कोटी रुपयांचे बिल रुग्णांना कमी करून दिले
 • म्युकर मयकोसीस जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळ्यांचे उपचार मोफत करण्यात येणार
 • खासगी रुग्णालय लसीसाठी जास्त दर आकारण्यात येतो. त्यांना योग्य दर लावण्याबाबत आवाहन करू. मात्र हे रुग्णालय थेट कंपन्यांकडून लस खरेदी करतात त्यावर राज्यसरकार अंकुश ठेवू शकत नाही
 • कंपन्यांनी आपल्या कामगारांना स्वतःच्या खर्चाने लसीकरण करण्यात यावे.
 • लॉकडाऊन 15 दिवसांसाठी वाढवण्यात आला मात्र नवीन नियम 1 तारखेला जाहीर करण्यात येतील
 • पुण्यातला शनिवार रविवार चा लॉकडाऊन काढून टाकले, या दिवशी देखील अत्यावश्यक सेवा सुरू राहतील
 • राज्य सरकार उन्नती उपक्रम सुरू करत आहोत. सी एस आर माध्यमातून सॅनिटरी पॅड वाटप करणार

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिवराज नारियलवाले यांना जबर मारहाण करणार्‍या दोषींवर कठोर कारवाई करा!

सिद्धार्थने पोस्ट केले आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो