in

आज सर्वोच्च न्यायालयात ठरणार गोकुळ निवडणुकीचा फैसला

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा आज (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात फैसला होणार आहे. सत्तारूढ गटाच्या याचिकेवर गेल्या आठवड्यात न्यायालयाने निवडणुकीबाबत म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला होता. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग, त्यात दोन ठरावधारकांचा कोरोना संसर्गाने झालेला मृत्यू, या सर्व घडामोडींवर न्यायालय काय आदेश देते, याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

कोरोनाचे संकट वाढतच चालल्याने गोकुळ दूध संघ व्यवस्थापनाने कोरोना संकटाचा धोका गोकुळ निवडणुकीतही होवू शकतो. इतर संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या असताना गोकुळचीच निवडणुकीसाठी एवढा अट्टाहस कशासाठी? निवडणूकीत प्रचार करताना व मतदारांपर्यंत पोहचताना दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांना धोकादायक आहे. तरी इतर संस्थांप्रमाणे गोकुळची निवडणूकही स्थगित करावी, अशी याचिका दाखल केली होती. मात्र, एक महिन्यापुर्वी दाखल केलेल्या या याचिकेवर अद्याप सुनावणी झाली नव्हती. आज दुपारनंतर (दि. २६ एप्रिल ) यावरती सुनावणी होवून निवडणूकीचे भवितव्य ठरणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Update | मागील 24 तासांत 3.54 लाख नव्या रुग्णांची नोंद

ऑस्कर 2021 पुरस्कारांमध्ये ‘नोमडलँड’ची वर्णी