in

वर्ध्यात म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनची प्रतीक्षा संपली

भूपेश बारंगे | वर्धा : कोरोना नंतर आता म्युकर मायकोसिस(black function) रुग्ण वाढत असताना रुग्णांना धडकी भरली आहे. या आजाराला लागणाऱ्या इंजेक्शन मोठ्या प्रमाणात बाजारात तुटवडा निर्माण झाला होता. अनेकदा हे इंजेक्शन रुग्णांना मिळाले नाही. त्यामुळे अनेक रुग्ण जीव गमवावा लागला आहेय.. म्युकर मायकोसिस आजाराला लागणारे इंजेक्शन एम्फोटेरिसीन बी आता वर्ध्यातील जेनेटेक लाईफ सायसन्स कंपनी मध्ये तयार झाले असून सोमवार पासून वितरित केले जाणार असल्याची माहिती डॉ महेंद्र क्षीरसागर यांनी Lokशाहीला सांगितले.

भारतात एकमवे ठिकाणी तयार होणारे इंजेक्शन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मदतीने एम्फोटेरिसीन बी इंजेक्शन वर्ध्यातील जेनेटेक लाईफ सायन्स कंपनीमध्ये बनायला सुरवात झाली आहे. जेनेटेक कंपनी मध्ये सध्या 4500 व्हायल तयार झाले आहे. इतर ठिकणी या इंजेक्शन किंमत 7 हजार एवढी असताना मात्र वर्ध्यात तयार झालेलं इंजेक्शन किंमत मात्र 1200 रुपयात मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना नंतर म्युकर मायकोसिस रुग्ण वाढत असताना रुग्णाना लागणारे इंजेक्शन तुटवडा असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना काळ्या बाजारात वाढीव दराने जवळपास 40 ते 50 हजार किमतीत खरेदी करावे लागत होती. आता मात्र हेच इंजेक्शन अवघ्या 1200 रुपयात मिळणार असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे. वर्ध्यात तयार झालेल्या एम्फोटेरिसीन बी इंजेक्शन सोमवार पासून वितरित केले जाणार आहे.

एम्फोटेरिसीन बी इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने रुग्णाची भटकंती थांबणार

म्युकर मायकोसिस आजाराला लागणारे इंजेक्शन वर्ध्यात बनायला सुरुवात झाली आहे. दररोज 20 हजार व्हायल तयार केले जाणार आहे. सध्या 4500 व्हायल तयार झाले असून सोमवारी वितरित केले जाणार आहे. त्यामुळे या इंजेक्शन प्रतीक्षा होती ती संपली म्हणावं लागेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार का? आज ठाकरे सरकारची महत्त्वाची बैठक

कोरोना रुग्णाला राहायला जागा मिळत नसल्याने मालवाहू रिक्षात महिला क्वारंटाईन