लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोनाच्या काळात गर्दी टाळण्यासाठी विविध बाबींवर घालण्यात आलेले निर्बंध आता कमी केले जात आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी याबाबत नवी नियमावली जाहीर केली असून आता चित्रपटगृह आणि जलतरण अधिक क्षमतेने वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. १ ते २८ फेब्रुवारीसाठी हे आदेश लागू असणार आहेत.

गृह मंत्रालयाने नवी एसओपी जाहीर करत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले की, निरिक्षण, कंटेन्मेंट झोन आणि सुरक्षेबाबत जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हे निर्देश १ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहेत.

त्याचबरोबर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कन्टेंमेंट झोनबाहेर सर्व व्यवहारांना परवानगी असेल. सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांना राज्यांच्या एसओपींप्रमाणे परवानगी दिली जाईल.

राज्यांतर्गत तसेच आंतरराज्यीय प्रवासादरम्यान वस्तू नेण्यास कोणतेही प्रतिबंध असणार नाही. यासाठी कोणत्या वेगळ्या परवानगीची गरज नाही. तसेच आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यावर जोर देण्यात आला